महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संकट : निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला माहूरगड शांत-शांत

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. दरवर्षी या काळात माहूरगड येथे भक्तांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे माहूरगड शांत-शांत झाले आहे.

edited photo
edited photo

By

Published : Jul 18, 2020, 3:25 PM IST

नांदेड - सह्याद्री पर्वत रांगात निसर्ग सौंदर्याने नटलेला माहूरगड सध्या शांत भासत आहे. पावसाळ्यात येथीाल निसर्गाचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. पर्यटनासोबतच आदिशक्ती रेणुकामातेचे दर्शन म्हणजे भाविकांसाठी दुहेरी पर्वणी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माहूरगड शांत-शांत असल्याचे चित्र दिसत आहे.

माहूरगड महाराष्ट्रातील शक्तिपीठ म्हणून मानले जाते. येथे रेणुका देवीचे मंदिर असून काही अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामांची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे, असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर हा गड हिरवाईने सजतो. मोठ्या संख्येने महाराष्ट्रसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात व राजस्थान या भागातून पर्यटक येतात. पण, यंदाच्या कोरोनाच्या संकटामुळे मात्र माहूरची नगरी सुनसान झाली आहे. ना पर्यटक, ना भाविक यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारे व्यवसायही ठप्प आहेत. येथील मातृतीर्थ तलाव हा तुडुंब भरला आहे. माता रेणूकाच या कोरोनाच्या संकटातून मुक्त करेल, अशी आशा भक्तांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details