महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये शनिवारी कोरोनाचे 9 रुग्ण आढळले तर, 4 जण कोरोनातून मूक्त - Nanded covid 19 death cases

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 जण कोरोनातून बरे झाले आहेत. 4 जुलै रोजी प्राप्त अहवालात 68 अहवाल निगेटिव्ह तर 9 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत.

Nanded civil hospital
नांदेडमध्ये शनिवारी कोरोनाची 9 रुग्ण आढळले तर 4 व्यक्ती कोरोनातून मुक्त

By

Published : Jul 5, 2020, 8:25 AM IST

नांदेड - कोरोना आजारातून शनिवारी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4 कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 जण कोरोनातून बरे झाले आहेत. 4 जुलै रोजी प्राप्त अहवालात 68 अहवाल निगेटिव्ह तर 9 नवीन कोरोनाबाधित आढळले.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 423 एवढी झाली आहे. नवीन बाधितांमध्ये गणेशनगर येथील 63 वर्षाची 1 महिला, देगलूर येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, आंबेडकरनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, अशोकनगर येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील 31 वर्षाची 1 महिला, बिलोली येथील 71 वर्षाची 1 महिला, 33 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील दापका येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील 49 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे.

सद्यस्थितीत या सर्व कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 423 बाधितांपैकी 310 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 95 कोरोनाबाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 6 पुरुष कोरोनाबाधिताचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात 95 कोरोनाबाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 31 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 43 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 3, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2, नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात 1 बाधित उपचार घेत आहे. तर 10 कोरोनाबाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

शनिवार 4 जूलै रोजी 116 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती -

सर्वेक्षण - 1 लाख 45 हजार 128,

घेतलेले स्वॅब - 6 हजार 829,

निगेटिव्ह स्वॅब - 5 हजार 849,

शनिवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 9,

एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती- 423,

शनिवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 16,

मृत्यू संख्या- 18,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 310,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 95,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 116 एवढी संख्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details