महाराष्ट्र

maharashtra

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे नवे 40 रुग्ण; चार जणांचा मृत्यू

By

Published : Jul 29, 2020, 8:37 PM IST

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 568 एवढी आहे. यापैकी 790 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 693 कोरोनाबाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. त्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड सरकारी रुग्णालय
नांदेड सरकारी रुग्णालय

नांदेड– जिल्ह्यात आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 20 व्यक्तींना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर 40 व्यक्तींना कोरोना झाल्याचे अहवाल आले आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार एकूण 242 अहवालापैकी 179 अहवाल निगेटिव्ह आले.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 568 एवढी आहे. यापैकी 790 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 693 कोरोनाबाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. त्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये 7 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे.


जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या 74

दिपनगर नांदेड येथे 27 जुलैला 58 वर्षाच्या पुरुषाचा, 28 जुलैला किनवट कलारी येथील 54 वर्षाचा मजुराचा, शेतमजूरवाडी तामसा येथील 25 वर्षाच्या महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 29 जुलैला सराफा गल्ली येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शहरातील जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत व्यक्तींची संख्या 74 एवढी झाली आहे.

बरे झालेल्या 20 जणांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 9, डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व खासगी रुग्णालयातील 10 जणांचा समावेश आहे.

आरटीपीसीआर तपासणीत या ठिकाणी आढळले कोरोनाबाधित-

श्रीनगर नांदेड येथील 63 वर्षाची 1 महिला, फारुकनगर नांदेड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, जवाहरनगर नांदेड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, शिवकल्याणनगर नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट नांदेड येथील 7,10, 12,30,31,33 वर्षाचे 6 पुरुष व 26 वर्षाची 1 महिला, मगनपुरा नांदेड येथील 33 वर्षाचा 1 पुरुष, वसंतनगर नांदेड येथील 34,37,46 वर्षाचे 3 पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील 16 वर्षाचा 1 पुरुष व 60 वर्षाची 1 महिला, दिपकनगर नांदेड येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, वजिराबाद नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष आढळला आहे. तर पाठक गल्ली नांदेड येथील 20 व 21 वर्षाचे 2 पुरुष, किनवट येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, कलारी किनवट येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, एसव्हीएम कॉलनी किनवट येथील 52,60 वर्षाचे 2 पुरुष कोरोनाबाधित आढळले आहेत.

आंध्र बस स्टँड धर्माबाद येथील 70,75 वर्षाच्या 2 महिला, करिम कॉलनी आर्धापूर येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, शेतमजूर वाडी तामसा हदगाव येथील 25 वर्षाची 1 महिला, हेतेपूर कंधार येथील 36,42 वर्षाच्या 2 महिला, नवीन मोंढा परभणी येथील 18 वर्षाची 1 महिला, हिंगोली येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, कळमनूरी हिंगोली येथील 57 वर्षाचा 1 पुरुष हे कोरोनाबाधित आढळले आहेत.

पुसद यवतमाळ येथील 38 वर्षाच्या एका पुरुषाचा यात समावेश आहे. तर अँटिजेन तपासणीद्वारे भाग्यनगर नांदेड येथील 21 व 28 वर्षाचे 2 पुरुष, कौसरनगर चुनाभट्टी नांदेड येथील 23 वर्षाचा 1 पुरुष, बोरबन वजिराबाद नांदेड येथील 44 वर्षाच्या एका पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे.


जिल्ह्याची कोरोनाच्या स्थितीबाबत एक दृष्टीक्षेप

सर्वेक्षण-1 लाख 48 हजार 648
घेतलेले स्वॅब- 13 हजार 400
निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 419
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 40
एकूण कोरोनाबाधित व्यक्ती- 1 हजार 568
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14
मृत्यू संख्या- 74
रुग्णालयातून सुट्टी दिलेली व्यक्तींची संख्या-790
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण- 693
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 482

ABOUT THE AUTHOR

...view details