नांदेड- जिल्ह्यात सोमवार 14 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 341 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 353 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 176 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 177 बाधित आले. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या एकूण 1 हजार 62 अहवालापैकी 665 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 11 हजार 837 एवढी झाली असून यातील 7 हजार 696 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 3 हजार 761 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 58 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात शुक्रवार 11 सप्टेंबरला कैलास नगर नांदेड येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे, रविवार 13 सप्टेंबरला अर्धापूर तालुक्यातील दिग्रस येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा, बालाजी मंदिर परिसर मुखेड येथील 68 वर्षाच्या एका महिलेचा, हनुमानगड नांदेड येथील 51 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे, तर सोमवार 14 सप्टेंबर रोजी मगनपुरा नांदेड येथील 65 वर्षाचा एका पुरुषाचा, बजरंग कॉलनी नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा हदगाव कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 318 झाली आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
नांदेडात सोमवारी 353 बाधितांची भर, सात जणांचा मृत्यू - nanded corona positive patient news
नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.त्यातच आज सोमवारी १४ सप्टेंबरला नवीन ३५३ व्यक्ती बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 696 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
एकुण घेतलेले स्वॅब- 65 हजार 862,
निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 912,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 353,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 11 हजार 837,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 31,
एकूण मृत्यू संख्या- 318,
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 7 हजार 696,
आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 761,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 183,
आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 58,
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 67.17 टक्के