नांदेड- दुष्काळाची तीव्रता जास्त असलेल्या माहूर किनवट तालुक्यातील तब्बल ३५ गावांमधील नागरिकांना आमदार प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. माहूर तालुक्यातील मेंडकी, मुंगशी, सिंदखेड, पाचुंदा या चार गावांचे प्रस्ताव मंजूर होऊनही तेथे टँकर पोहचत नाहीत. त्या ठिकाणी टँकर पोहचविल्याने काही अंशी का होईना पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ३५ गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
दुष्काळाची तीव्रता जास्त असलेल्या माहूर किनवट तालुक्यातील तब्बल ३५ गावांमधील नागरिकांना आमदार प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
तालुक्यात उष्णतेची धग वाढल्याने पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यांतील काही गावात नागरिकांना हंडाभर पाणी मिळणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुष्काळग्रस्त गावांतील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून त्यांची तहान भागविण्यासाठी आमदार प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. गतवर्षी ही याच पद्धतीने अनेक गावात पाणी पोहचविण्यात आले होते.
तालुक्यात सध्या प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे टँकर गुत्तेदार व पदाधिकाऱयांत कलगीतुरा रंगला असताना टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. या सकारात्मक पाऊलामुळे टंचाईग्रस्त गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.