नांदेड - नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असताना वाहतूकही बंद आहे. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी राकडे याचे नियोजित लग्न आज शुक्रवार उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे झाले. तत्पूर्वी आजच्या टिळा, हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या होडीवरून सासुरवाडीत पोहचला ( Navradeva traveled by boat for reached wedding ) होता. या गोष्टीची पूर्ण पंचकुशीत चर्चा सुरु आहे.
लग्नासाठी नवरदेवाचा जीवघेणा प्रवास - लग्नासाठी पुरातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या युवकाच आज थाटात लग्न पार पडले. नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर आला. नांदेड मधील हदगाव तालुक्यात पैनगंगा, कयाधु नदीला पूर आला. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. हदगाव मधील करोडी येथील युवक शहाजी राकडे याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेड तालुक्यातील चिंचोळी येथील गायत्री गोंडाडे या युवतीशी जमला होता.
अखेर झाले लग्न -14 जुलै रोजी हळद आणि टिळयाचा कार्यक्रम आणि 15 जुलै रोजी लग्न ठरले. पण मागील अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये पाऊस सुरू होता. अनेक मार्ग बंद झाले. हदगाव -उमरखेड हा मार्ग बंद झाला. पण कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचे असे ठरवलेल्या नवरदेवाने पुराच्या पाण्यातून वरात काढली. करोडी ते चिंचोली असा सात किलोमीटरचा प्रवास थर्माकोलचच्या हुड्यावर करून हा पठ्ठा लग्नस्थळी पोहचला. टीळा आणि हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. आणि त्याच लग्न देखील झाले. पुरातून लग्नासाठी जातांनाचा त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.