महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाचे तुकडे करून काँग्रेसला २ पंतप्रधान हवे आहेत - नरेंद्र मोदी - ashok chavan

या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर

By

Published : Apr 7, 2019, 5:33 AM IST

नांदेड - काँग्रेस आणि त्यांच्या महागठबंधनला २ पंतप्रधान हवे आहेत. देशद्रोहाचा कायदा रद्द करणे योग्य नाही. काश्मीरमधील आजच्या स्थितीला काँग्रेस जबाबदार आहे. आता या आगीला अजून काँग्रेस आणि त्यांचे साथी भडकविण्याचे काम करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा झाली


नांदेडमध्ये झालेल्या या सभेत मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर जोरदार टीका केली. चिटफंड, बोफार्स, हेलिकॉप्टर काँग्रेसचे घोटाळे अनेक आहेत. इटलीच्या त्या गुन्हेगाराला अटक करण्याचे काम या चौकीदाराने केले आहे. हेलिकॉप्टरच्या घोटाळ्यात कोण-कोण सामील आहे. हे लक्ष्यात येतच आहे. तुमचे एक मत या देशात नवा बदल घडवेल. भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता थारा नाही. काँग्रेसची स्थिती बिकट आहे. यावेळी काँग्रेस ४४ च्याही मागे येईल, असे मोदी यावेळी म्हणाले.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे, सुरजितसिंह ठाकूर, भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, शिवसेना उमेदवार हेमंत पाटील, बंडू जाधव, आमदार राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details