नांदेड - मेघालयमध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या नांदेडच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. गणेश चव्हाण असे त्यांचे नाव आहे. रविवारी सकाळी त्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मेघालयात सीमा सुरक्षा दलातील नांदेडच्या जवानाचा मृत्यू... - nanded ganesh chavhan news
मेघालयमध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या नांदेडच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. गणेश चव्हाण असे त्यांचे नाव आहे. गणेश यांचे पार्थिव आज (सोमवारी) कुरुळा येथे दाखल होणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मेघालयात सीमा सुरक्षा दलात कार्यरत नांदेड येथील जवानाचा मृत्यू...
जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कुरुळा गावातील जवान गणेश चव्हाण हे मेघालय राज्यातील तुरी येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. गणेश यांचे पार्थिव आज (सोमवारी) कुरुळा येथे दाखल होणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.