महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची ३ फेब्रुवारीला होणार निवड - नांदेड जिल्हा परिषद बातमी

अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान उमेदवारांचे नामनिर्देशन स्वीकारण्यात येतील. दुपारी दोनच्या दरम्यान बैठकीद्वारे अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यात येतील. त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी विषय समित्यांचे सभापतींची निवड जाहीर करण्यात येणार आहे.

nanded-zilla-parishad-subject-committees-to-be-elected-on-3-february
nanded-zilla-parishad-subject-committees-to-be-elected-on-3-february

By

Published : Jan 23, 2020, 6:30 PM IST

नांदेड-जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर लक्ष लागून असलेल्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशाद्वारे जाहीर केलेल्या निवड प्रक्रियेनुसार अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर पंधरा दिवसांच्या आत विषय समित्यांची सभापती निवड आवश्यक आहे.

हेही वाचा-माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल

अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी (दि. ३ फेब्रुवारी) मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान उमेदवारांचे नामनिर्देशन स्वीकारण्यात येतील. दुपारी दोनच्या दरम्यान बैठकीद्वारे अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यात येतील. त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी विषय समित्यांचे सभापतींची निवड जाहीर करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details