माहूर (नांदेड)-कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी व सरकारला आर्थिक मदत देण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. असाच एक खारीचा वाटा माहूर येथील विद्यार्थ्यांनी उचललाय. सैफ व कैफ या दोन चिमकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माहूर येथील तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
माहूरचे विद्यार्थी सैफ फिरोज दोसानी व कैफ सरफराज दोसानी या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारे खाऊचे पैसे खर्च न करता ते पैसे आपल्या पिग्गी बँकमध्ये जमवले. वर्षभराची जमवलेली रक्कम दोघा भावंडांनी आज तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडे सुपूर्द केली.