महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आसना नदी पूरात अडकलेल्या सात जणांची सुटका; गरोदर माता, मूकबधिर व्यक्ती आणि तीन बालक सुखरूप - Marathwada Rain

अर्धापूर तालुक्यातील आसना नदी पुरात पिंपळगाव महादेव येथील शेतकरी आनंदराव विठ्ठलराव देशमुख यांच्या शेतात कामानिमित्त गेलेले शेत मजुर आसना नदीच्या पुरामुळे अखाड्यावर अडकले होते. त्यांना मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे. सोमवारच्या पावसाने मंगळवारी ही आपला जोर कायम ठेवला. अशातच सोमवारी देशमुख यांच्या अखाड्यावर दोन महिलांसह, दोन पुरुष शेत मजुर तसेच तिन बालके असे एकूण सात जण होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे आसना नदी दुथडी भरून वाहत होती. यावेळी देशमुख यांच्या अखाड्यास पुराच्या पाण्याने वेडा घातला. जीव वाचविण्यासाठी या मजूरांनी उंच भागाचा सहारा घेतला यावेळी मोबाईल फोन बंद असल्याने कोणताही संपर्क होत नव्हता. सायंकाळ पर्यंत पुराचे पाण कमी झाले नव्हते.

Nanded Seven people trapped in Asana river flood rescued
आसना नदी पुरात अडकलेल्या सात जणांची सुटका

By

Published : Sep 9, 2021, 7:57 AM IST

नांदेड - अर्धापूर परिसरात मुसळधार पावसाने कहर केला असतानाच महसूल व पोलीस प्रशासन, स्थानिकांच्या सहकार्याने असना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांच्या अथक प्रयत्नाने सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. पिंपळगाव व सांगवी शिवारात आनंदराव विठ्ठलराव देशमुख यांच्या आखाड्यात कामानिमित्त गेलेले शेत मजुर व त्यांचे कुटुंब नदीच्या पुरामुळे शेतात अडकले होते. त्यांना पोलीस, पंचायत समिती, महसूल प्रशासन व स्थानिक लोकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले आहे.

अर्धापूर तालुक्यातील आसना नदी पुरात पिंपळगाव महादेव येथील शेतकरी आनंदराव विठ्ठलराव देशमुख यांच्या शेतात कामानिमित्त गेलेले शेत मजुर आसना नदीच्या पुरामुळे अखाड्यावर अडकले होते. त्यांना मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती सुखरुप बाहेर काढले आहे. सोमवारच्या पावसाने मंगळवारी ही आपला जोर कायम ठेवला. अशातच सोमवारी देशमुख यांच्या अखाड्यावर दोन महिलांसह, दोन पुरुष शेत मजुर तसेच तिन बालके असे एकूण सात जण होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे आसना नदी दुथडी भरून वाहत होती. यावेळी देशमुख यांच्या अखाड्यास पुराच्या पाण्याने वेडा घातला. जीव वाचविण्यासाठी या मजूरांनी उंच भागाचा सहारा घेतला यावेळी मोबाईल फोन बंद असल्याने कोणताही संपर्क होत नव्हता. सायंकाळ पर्यंत पुराचे पाण कमी झाले नव्हते.

दरम्यान घटनेची माहिती तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले. स्वतः तब्बल चार ते पाच किमीचे अंतर चिखल नाले,काटेरी झुडपे, पाण्यातून पार करत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यामध्ये दादाराव मधुकर राठोड (वय २५), सहा महिन्याची गरोदर पुजा दादाराव राठोड (वय २२), आराध्या दादाराव राठोड (वय ४) हे सर्व माहूर तालुक्यातील उनकेश्वर येथील रहिवासी आहेत. गणेश हरी सोळंके (वय २५ -मूकबधिर), संगिता गणेश सोळंके (वय २२), पायल गणेश सोळंके (वय १२),अजय गणेश सोळंके (वय ९) सर्व राहणार हादगाव जि. नांदेड. या सात जणांना शेलगाव मार्गे सुरक्षित बाहेर काढले. यावेळी गोविंद कल्याणकर, अनिल कल्याणकर,रावसाहेब राजेगोरे,किशन कल्याणकर,पोलिस पाटील उल्हासराव कल्याणकर,बाबुराव राजेगोरे,मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे,प्रदिप कल्याणकर,नारायण राजेगोरे,सरपंच प्र.कपिल दुधमल यांनी मोठी मदत केली.

हद्दीचा विचार न करता पोलिस प्रशासनाने जपली माणुसकी...
पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बालाजी तोरणे यांनी हद्दीचा विचार न करता योग्य रित्या परिस्थिती हातळून त्या सात जणांची सुखरुप सूटका केली. यावेळी जमादार ईश्वर लांडगे, ग्रामसेवक अनिल गिते, संजय खिल्लारे, पोलीस पाटील व ग्रामस्थांंच्या मदतीने पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यात आली.

पुराच्या पाण्यामुळे रात्रीच्या मोहीमेस सकाळी यश
पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात जणांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खुल्या जागेपासुन अखाडा सुमारे ३ ते ५ कि. मी. वर होता. अनेक अडचणी येत असल्याने मध्यरात्री कारवाई थांबवण्यात आली. बुधवारी पहाटे पुन्हा शोध मोहिम सुरू करून पूरात अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला सकाळी यश आले.

ABOUT THE AUTHOR

...view details