महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात गुरूवारी नव्या 995 कोरोनाबाधित रुग्णांची भर; 26 रुग्णांचा मृत्यू

गुरूवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 57 अहवालापैकी 995 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजच्या घडीला 10 हजार 319 रुग्ण उपचार घेत असून 172 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

nanded records 995 fresh Covid cases, 26 deaths in last 24 hours
नांदेड जिल्ह्यात गुरूवारी नव्या 995 कोरोनाबाधित रुग्णांची भर; 26 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Apr 2, 2021, 3:19 AM IST

नांदेड- जिल्ह्यात गुरूवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 57 अहवालापैकी 995 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 422 तर अँटिजेन तपासणीद्वारे 573 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 44 हजार 30 एवढी झाली असून यातील 32 हजार 653 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 319 रुग्ण उपचार घेत असून 172 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. दि. 30 व 31 मार्च या दोन दिवसांत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 820 एवढी झाली आहे.

जिल्ह्यात 10 हजार 319 बाधितांवर औषधोपचार सुरु

जिल्ह्यात 10 हजार 319 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 246, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 129, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 101, मुखेड कोविड रुग्णालय 254, देगलूर कोविड रुग्णालय 46, जैनब हॉस्पीटल कोविड केअर देगूलर 55, बिलोली कोविड केअर सेंटर 35, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 24, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 21, हदगाव कोविड रुग्णालय 41, हदगाव कोविड केअर सेंटर 60, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 106, कंधार कोविड केअर सेंटर 10, महसूल कोविड केअर सेंटर 195, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, धर्माबाद कोविड केअर सेंटर 34, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18 , बारड कोविड केअर सेंटर 5, मांडवी कोविड केअर सेंटर 21, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 76, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 789, खाजगी रुग्णालय 762 , लातूर येथे संदर्भित 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 19, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7 याचा समावेश आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब - 3 लाख 17 हजार 611
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 66 हजार 944
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 44 हजार 30
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 32 हजार 653
एकूण मृत्यू संख्या - 820
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - 74.16 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 15
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 36
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 407
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 10 हजार 319
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले -172

हेही वाचा -नांदेड पोलिसांवर हल्लाबोल प्रकरण : अति उत्साही तरुणांमुळे घडला प्रकार

हेही वाचा -नांदेडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक; खाटांची संख्या वाढवूनही पडतेय अपुरी..!

ABOUT THE AUTHOR

...view details