नांदेड - संचारबंदीच्या काळातही नांदेडमध्ये रेतीची तस्करी जोमात सुरू आहे. नांदेडजवळच्या असर्जन आणि कौठा भागात गोदावरी पात्रातून रेतीची तस्करी होते आहे. प्रशासनाने रात्री रेतीची तस्करी करणारे लाखो रुपयांचे तराफे जाळून नष्ट केले आहेत. तसेच तस्करीसाठी नदीपात्रातून काढलेली चाळीस ट्रक रेती जप्त केली आहे. महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये संचारबंदीतही वाळूची तस्करी सुरूच; प्रशासनाकडून तराफे जाळले
प्रशासनाने रात्री रेतीची तस्करी करणारे लाखो रुपयांचे तराफे जाळून नष्ट केले आहेत. तसेच तस्करीसाठी नदीपात्रातून काढलेली चाळीस ट्रक रेती जप्त केली आहे. महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये संचारबंदीतही वाळूची तस्करी सुरूच; प्रशासनाकडून तराफे जाळले
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातदेखील रेती तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी इटनकर, उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण तसेच नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी ही कार्यवाही केली आहे. या कारवाईने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.