नांदेड - आजवर एकही कोरोना रुग्ण नसलेल्या नांदेड शहरात नुकताच एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा प्रचंड खबरदारी घेत असणतानाही काही लोक मात्र विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत.
नांदेडच्या रस्त्यावर 'यम' अवतरला, बिनकामाचे सापडले तावडीत - नांदेडच्या रस्त्यावर यम अवतरला, बिनकामाचे सापडले तावडीत
विनकामाचे रस्त्यावर फिरणाऱ्यांवर रोक लावण्यासाठी नांदेड पोलिसांनी एक युक्ती लढवली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या भेटीला चक्क यम येतो. त्यांची कुंडली चित्रगुप्त मांडतो. त्यांना धडा शिवून सेल्फीसह परत पाठवले जाते. यामुळे काही प्रमाणात बिनकामाचे भटकणाऱ्यांवर रोक लागली आहे.

Breaking News
नांदेडच्या रस्त्यावर 'यम' अवतरला
आता या बिनकामी फिरणाऱ्यांना पोलीस विभाग धडा शिकवण्यासाठी चक्क यमदेवाला घेऊन आले आहेत. शहरातील वजिराबाद चौकात यमदेव आणि चित्रगुप्त उभे असून जो व्यक्ती बिनकामी फिरताना आढळून आला त्याची विचारपूस करत आहेत. या पुढे बिनकामी फिरणार नाही अशी ग्वाही त्या व्यक्तीकडून घेतली जाते
त्यानंतर यमदेव आणि चित्रगुप्त त्या व्यक्तीसोबत सेल्फी घेतात आणि मग त्याला जाऊ दिले जात आहे. पोलिसांच्या या नव्या युक्तीमुळे काही प्रमाणात रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.