नांदेड - नायगाव तालुक्यात अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुकर्म करणाऱ्या भावोजीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेहुणीला खोटे कारण सांगत महाविद्यालयातून नेऊन आरोपीने अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील राहेर येथील मूळ रहिवासी असलेला आरोपी सध्या तेलंगणातील बोधन येथे सुतार काम करतो. पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीसोबत त्याचा विवाह झाला आहे. तर आरोपीची मेहुणी नायगावमध्ये तिच्या चुलत्यांकडे राहण्यास असून ती कनिष्ठ महाविद्यालात शिक्षण घेत आहे. ५ जुलैच्या सकाळी ११ च्या दरम्यान आरोपी दुचाकी घेऊन कॉलेजमध्ये मेहुणीकडे गेला. तुझे चुलते गावाला गेले असून तुला आणण्यास मला पाठवले आहे, असे खोटे कारण सांगितले.