महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फिल्मी स्टाईल कारवाई करत अपहरणाचा कट उधळला; नांदेड पोलिसांची कारवाई - नांदेड पोलीस बातमी

खून, दरोडा, बलात्कार आणि अपहरणाच्या घटनेनं नांदेड हादरले आहे. मागील सात दिवसात लागोपाठ दोन खुनाच्या, तर एक भर दिवसा सशस्त्र दरोड्याची घटना घडली. शुक्रवारी देखील गुन्हेगारांचा थरार नांदेडकरांनी अनुभवला. तीन दिवसांपूर्वी लोहा येथील एका सोळा वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई करत अपहरणाचा कट उधळून लावला.

nanded latest crime news  nanded latest kidnapping news  nanded police latest news  नांदेड गुंड विकास हटकर बातमी  नांदेड पोलीस बातमी  नांदेड अपहरण बातमी
फिल्मी स्टाईल कारवाई करत अपहरणाचा कट उधळला; नांदेड पोलिसांची कारवाई

By

Published : Aug 8, 2020, 7:00 AM IST

नांदेड -लोहा येथील सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई करत अटक केली. नांदेड शहरालगत असलेल्या निळा रोडवर ही कारवाई केली. विकास हटकर, असे या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी हा गोळीबाराचा थरार घडला.

खून, दरोडा, बलात्कार आणि अपहरणाच्या घटनेनं नांदेड हादरले आहे. मागील सात दिवसात लागोपाठ दोन खुनाच्या, तर एक भर दिवसा सशस्त्र दरोड्याची घटना घडली. शुक्रवारी देखील गुन्हेगारांचा थरार नांदेडकरांनी अनुभवला. तीन दिवसांपूर्वी लोहा येथील एका सोळा वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई करत अपहरणाचा कट उधळून लावला.

लोहा येथील भटक्या समाजातील मुलाचे अपहरण विकास हटकर याने केले होते. शुभम गिरी, असे पीडित मुलाचे नाव आहे. पीडित मुलाचा फोन वापरत आरोपी विकासने खंडणीची मागणी देखील केली होती. पोलीस देखील विकास हटकरच्या मागावर होते. दरम्यान. तपास चालू असताना शुक्रवारी सायंकाळी नांदेड शहरातील निळा रोड परिसरात विकास असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक आणि एल.सी.बी च्या पथकाने तत्काळ विकासचा शोध घेत घटनास्थळ गाठले. मात्र, आक्रमक असलेला आरोपी विकास पोलिसांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी घटनास्थळी हजर असलेले पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी विकासच्या दिशेने गोळ्या झाडल्या. जायबंदी झालेल्या विकास आणि अन्य एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित मुलगा देखील सुखरूप असल्याची माहिती आहे. विकास हटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात दरोडा, चोरी, घरफोड्या सारखे गंभीर आरोप दखल आहेत. जायबंदी झालेल्या विकासला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा कट उधळला गेला.

असा लागला तपास-

अपहरण केल्यानंतर आरोपींनी खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी पीडित मुलाच्या मोबाईलचा वापर केला होता. या दरम्यान संभाषण केलेले सर्व कॉल रेकॉर्ड होत होते. एल.सी.बी चे सहाय्यक पोलीस निरीक्ष पी. डी भरती यांनी संभाषणातील आरोपींचा आवाज ओळखला होता. तो आरोपी विकास हटकर असल्याची पुष्टी पोलिसांना झाली होती. तो पट्टीतला आरोपी असल्याची माहिती देखील त्याच्याकडे होती.

ABOUT THE AUTHOR

...view details