महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Patients Death Case : 'त्या' प्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल; डॉक्टर्सनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा दिला होता इशारा - रुग्णालयातील स्वच्छतागृह

Nanded Patients Death Case : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावलं याविरोधात स्वतः डीन डॉ एस आर वाकोडे यांनी तक्रार दाखल केलीय.

Nanded Patients Death Case
Nanded Patients Death Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 9:12 AM IST

Updated : Oct 4, 2023, 9:48 AM IST

नांदेड Nanded Patients Death Case : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावलं. मात्र, हेमंत पाटलांना हे प्रकरण चागलंच भोवलं असून त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्या या कृत्यावर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुग्णालयाचे डीन डॉ. एस.आर. वाकोडे यांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली. (case filed against mp hemant patil)

सुशील कुमार नायक, एसडीपीओ, नांदेड पोलीस

सेंट्र्ल मार्डचा आंदोलनाचा इशारा : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकी संदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झालंय. खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डॉक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करतील असा इशारा दिलाय. घडलेल्या या प्रकारामुळं फक्त अधिष्ठातांचे मानसिक खच्चीकरण झाले नसून संपूर्ण डॉक्टरांसाठी ही अपमानास्पद गोष्ट असल्याचं सेंट्र्ल मार्डनं म्हटलंय. तसंच हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशाराही मार्डकडून देण्यात आलाय. यामुळं राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार असल्याची भूमिका सेंट्र्ल मार्डनं घेतलीय.

काल काय घडलं : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृह अतिशय घाणेरड्या अवस्थेत होते. तर अनेक शौचालय ब्लॉकही होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृह देखील नव्हते. त्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावलं. यानंतर खासदार हेमंत पाटलांवर विराधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान खासदारावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसंच खासदारांनी केलेल्या कृत्यामुळे आदिवासी समाजाकडून निषेध व्यक्त केला जातं आहे.

Last Updated : Oct 4, 2023, 9:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details