नांदेड - लोकसभेच्या रणधुमाळीत नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजप-वंचित बहुजन आघाडी, अशी तिहेरी लढत होत आहे. याठिकाणी एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि वंचित अशी तिहेरी लढत - वंचित बहुजन आघाडी
नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजप-वंचित बहुजन आघाडी, अशी तिहेरी लढत होत आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय
लोकसभेच्या निवडणुसाठी १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदान करणार आहेत. यात प्रामुख्याने दीड लाख नवमतदार आहेत. हे मतदार ज्याला कौल देतील, तो उमेदवार निवडून येणार आहे, असे चित्र समोर येत आहे.
निवडणुकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्र असून मतदान प्रकिया सुरळीत पार पडण्यासाठी ११ हजार १५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे.