नांदेड- मध्य रेल्वेच्या सोलापूर ते वाडी विभागातील वाडमिंगे ते भाळवणी स्थानकादरम्यान ३५ कि.मी दुहेरीकरणाचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाले असून तेथे रुळ जोडण्यात येणार आहेत. म्हणून दि. १६ ते २७ ऑगस्ट या काळात नॉन इंटरलॉक वर्कींग कामामुळे नांदेड-पनवेल-नांदेड मार्गावरील गाड्या, तसेच सोलापूर विभागातून देशभरात धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ही माहिती दक्षिणमध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे.
दुहेरी रेल्वे लाईनच्या कामामुळे नांदेड-पनवेल गाडीसह अनेक गाड्या रद्द नांदेड विभागातून रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे
नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी दि. २१ ऑगस्ट, नांदेड ते सीएटी दि. २२ ऑगस्ट, पनवेल ते नांदेड दि. १७ आणि दि. १९ व दि. २६ ऑगस्ट (सहा फेऱ्या), नांदेड ते पनवेल दि. १६ आणि दि. १८ व दि. २२ ऑगस्ट (सहा फेऱ्या), नागपूर ते कोल्हापूर (मार्गे परळी, पुर्णा, हिंगोली, वाशिम आणि अकोला) दि. १८ आणि दि. २२ ऑगस्ट, कोल्हापूर ते नागपूर दि. १९ व दि. २३ ऑगस्ट, पूणे ते अमरावती दि. १८ आणि दि. २३ ऑगस्ट, अमरावती ते पुणे दि. १९ व दि. २४ ऑगस्ट, निझामाबाद ते पंढरपूर दि. १६ ते दि. २६ ऑगस्ट, पंढरपूर ते निझामबाद दि. १७ ते दि. २४ ऑगस्ट या गाड्या पुर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच, मुंबई ते भूवनेश्वर दि. १७ ते दि. २३ ऑगस्ट, मनमाड औरंगाबाद-परळी-लातूर रोड मार्गे विकाराबाद, भुवनेश्वर ते मुंबई दि. १६ ते दि. २२ ऑगस्ट विकाराबाद-लातूर रोड-परळी, औरंगाबाद मार्गे मनमाड, मुंबई-हैद्राबाद दि. १६ ते दि. २२ ऑगस्ट आणि हैद्राबाद ते मुंबई दि. १७ ते दि. २३ ऑगस्ट या मार्गावरून धावणार आहेत.