महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड-पनवेल एक्स्प्रेस 25 डिसेंबरपासून पूर्ववत; मध्य रेल्वेची माहिती

नांदेड ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या गाड्या 25 डिसेंबरपासून पूर्ववत होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

nanded panvel express news
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस 25 डिसेंबरपासून पूर्ववत; मध्य रेल्वेची माहिती

By

Published : Dec 24, 2019, 11:22 PM IST

नांदेड - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाअंतर्गत येणाऱ्या माळशेज-कर्जत घाटातील रेल्वेरूळातचे काम सुरू असल्याने काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते.

परंतु, आता नांदेड ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या गाड्या 25 डिसेंबरपासून पूर्ववत होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत

1) गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस दि. 25 डिसेंबरपासून पूर्ववत होणार असून पनवेलपर्यंत धावणार आहे.
2) गाडी क्रमांक 17613 पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस दिनांक 26 डिसेंबरपासून पूर्ववत पनवेल येथून सुटणार आहे.
3) गाडी क्रमांक 07617 नांदेड ते पनवेल विशेष एक्स्प्रेस दिनांक 28 डिसेंबरपासून पूर्ववत होणार असून पनवेलपर्यंत धावणार आहे.
4) गाडी क्रमांक 07618 पनवेल ते नांदेड विशेष एक्स्प्रेस दिनांक 29 डिसेंबरपासून पूर्ववत पनवेल येथून सुटणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details