नांदेड - गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातून पाणी आल्याने बुधवारी दुपारी पावणेएक वाजता दहा क्रमांकाचे एक गेट उघडण्यात आले. यातून ४७१ क्युसेक ( घनमीटर प्रतिसेंकद ) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यानंतर पाणी कमी झाल्याने दुपारी सव्वा दोन वाजता गेट पुन्हा बंद करण्यात आले. सध्या विष्णुपुरी प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.
विष्णुपूरी धरण शंभर टक्के भरल्याने, एक तास धरणातून पाण्याचा विसर्ग हेही वाचा... नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक
गोदावरी नदीवर विष्णुपुरी येथे असलेला डॉ. शंकरराव चव्हाण धरण प्रकल्प यंदा ऑगष्ट अखेरपर्यंत मृतसाठ्यात होता. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. यानंतर गोदावरीत सोडलेल्या पाण्याचा फायदा विष्णुपुरी प्रकल्पाला झाला आहे. मृतसाठ्यात असलेल्या या प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा झाला. यानंतर मागील दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा शंभर टक्के झाला.
हेही वाचा...नांदेड: अवयव घेऊन जाण्यासाठी आलेल्या विमानाला अपघात
मंगळवारी विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली. यामुळे बुधवारी दुपारी पावणेएक वाजता दहा क्रमांकाचे एक गेट उघडण्यात आले. यातून ४७१ क्युसेक इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यानंतर दुपारी सव्वादोन वाजता गेट बंद करण्यात आल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा... नांदेड : शिवसेना नगरसेवकाचा मनपाच्या सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
विष्णुपुरीमध्ये झालेले अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी लाभ क्षेत्रातील साठवण तलाव भरून घेण्याची मागणी पुढे आली होती. या बाबत प्रकल्पाच्या यांत्रिकी विभागाकडून तशी चाचपणी करून पाणी कॅनॉलमध्ये सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, पाईपलाइन नादुरुस्त असल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची शक्यता होती. यामुळे कॅनालमध्ये पाणी सोडण्यात आले नाही. पाईपलाइनची दुरुस्ती झाल्यानंतरच ऑक्टोबर महिन्यात पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे सध्या प्रकल्पात पाण्याचा आवक वाढल्यास अतिरिक्त पाणी नदीत सोडल्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.