नांदेड - महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रविवारी रात्री रंगेहात पकडले आहे. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकना सोडून देण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.
हेही वाचा... माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज लंपास
अमोलसिंह भोसले यांच्याविरोधात ज्याने तक्रार केली त्या तक्रारदाराच्या भावाचे ट्रक जप्त केले होते. हे ट्रक सोडवायचे असतील तर लाच द्यावी लागेल, असे दोन मध्यस्थांनी तक्रारदाराला सांगितले. श्यामकुमार साईबाबू गोणगे (रा. निझामाबाद) आणि श्रीनिवास सत्यनारायणा जिनकला (रा. मिरयालगुडा) अशी या दोन मध्यस्थांची नावे आहे. या दोघांनी उपविभागीय अधिकाऱ्याला लाच मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करुन सहकार्य केले होते. भोसले सारख्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.