महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये महापालिका विरोधी पक्षनेते पदाबाबद आज निर्णय

गेल्या २०१७ मध्ये मनपा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसला बहुमत मिळाले. ८१ पैकी ७३ जागा काँग्रेसने मिळविल्या, तर भाजपला सहा जागा मिळाल्या. सेना, अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

nanded-municipality-opposition-leader-will-elected-today
nanded-municipality-opposition-leader-will-elected-today

By

Published : Jan 6, 2020, 10:37 AM IST

नांदेड- नांदेड मनपाच्या विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीबाबत महापौर दीक्षा धबाले यांनी आज दुपारी बारा वाजता सुनावणी ठेवली आहे. त्यात विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

२०१७ मध्ये मनपा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसला बहुमत मिळाले. ८१ पैकी ७३ जागा काँग्रेसने मिळविल्या तर भाजपला सहा जागा मिळाल्या. सेना, अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. भाजपच्या तत्कालीन महानगराध्यक्षांच्या पत्राआधारे व बऱ्याच संघर्षानंतर सत्ताधारी काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदी भाजपच्या गुरप्रीतकौर दिलीपसिंघ सोडी यांची नियुक्ती केली होती. परंतु, यावरून भाजपमध्येच खासदार चिखलीकर गटाच्या पाच नगरसेवकांनी आगळीक केली होती. हे प्रकरण प्रथम उच्च न्यायालयात गेले. तेथे तत्कालीन महापौरांनी विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी वापरलेली पद्धत चुकीची ठरवली होती. त्याविरुद्ध सोडी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने महापौरांचे विरोधी पक्षनेते नियुक्तीचे अधिकार कायम ठेवले होते. त्यानुसार महापौर दीक्षा धबाले यांनी आज (सोमवारी) दुपारी बारा वाजता मनपा विरोधी पक्षनेते निवडीबाबत चिखलीकर गटाचे दीपकसिंह रावत व गुरप्रीतकौर दिलीपसिंघ सोडी यांना आपापली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. उद्याच्या सुनावणीनंतर मनपा विरोधी पक्षनेते पदाचा पेच सुटण्याची अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details