नांदेड -नांदेड भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी गैरहजर राहून व उस्मानाबाद व औरंगाबादच्या नामांतरास पाठींबा दिल्या. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत ( pratap patil chikhalikar offer ashok chavan join bjp ) होते.
प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत. माजी मंत्री अशोक चव्हाण हे शिंदे सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी स्वतः सह जिल्ह्यातील चार आमदार गैरहजर ठेवून व औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामातरास पाठींबा देत अप्रत्यक्षरित्या भाजपाला पाठिंबाच दिलाय. त्यामुळे त्यांचे आभारच मानले पाहिजेत. तसेच, ते जर भाजपात आले तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे मी स्वागत करेन, असेही पाटील यांनी सांगितलं.