महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडचे मनसे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या - मनसेचे जिल्हाध्यक्ष

नांदेड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये हळहळ.

नांदेड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संभाजी जाधव

By

Published : Aug 27, 2019, 11:58 AM IST

नांदेड -शहराच्या तरोडा नाका परिसरातील राजेशनगर भागात राहणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव (47) यांनी आपल्या राहत्या घरी आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नांदेडचे मनसे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांची आत्महत्या

संभाजी जाधव हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. विद्यार्थी सेनेपासून मनसेसोबत जाणारे पहिले मनसैनिक म्हणून ते संपूर्ण मराठवाड्याला परिचित होते.

ही घटना सकाळी उघडकीस आली. यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. जाधव यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच शहरातून मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी जाधव यांच्या घरी गर्दी केली.

फडणवीस अन् मुनगंटीवार यांच्या पत्नीचाच महाराष्ट्रात विकास - नाना पटोले

व्यवसायाने शेतकरी असलेल्या जाधव यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. त्यामुळे शेतीचे कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र जाधव यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली, हे मात्र तपासाअंती समजेल, असे पोलिसांनी सांगितले.

चंद्रपुरात नागरिक पुरानं त्रस्त, मात्र आमदार भांगडीया दहीहंडीच्या जल्लोषात मस्त

ABOUT THE AUTHOR

...view details