नांदेड- हिमायतनगर येथील एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. यामधील आरोपीला मागील आठवड्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर आता दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात 'त्याच' आरोपीस भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 'आजन्म कारावास' - nanded minor girl rape case
हिमायतनगर येथील एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. यामधील आरोपीला मागील आठवड्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर आता दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात 'त्याच' आरोपीस भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हिमायतनगर येथे बालाजी देवकाते नामक व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. ही मुलगी घराबाहेर खेळत असताना 16 मार्चला तिला पळवण्यात आले. याच दिवशी देवकाते याने एका तासाच्या अंतराने आणखी एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलिसांत वेगवेगळ्या घटनेत बाल लैंगिक अत्याचार, पोक्सो, बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एस. काळे केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षी तसेच पुराव्यांआधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपी बालाजी देवकतेला 8 जानेवारीला पहिल्या प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप व 10 हजारांचा दंड ठोठावला. तर दुसऱ्या प्रकरणात 14 जानेवारीला जिल्हा सत्र न्यायालयाने देवकातेला पुन्हा एकदा जन्मठेपची शिक्षा व 10 हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली.