नांदेड - महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक कोरोनाच्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ३ महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कोरोना इफेक्ट: नांदेड महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
येत्या 30 एप्रिलला विद्यमान पदाधिका-यांचा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु, राज्यातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल.
नांदेड महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर
येत्या 30 एप्रिलला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु, राज्यातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. महापौर तसेच उपमहापौर यांचा कालावधी तरतुदीनुसार अडीच वर्षे आहे. नवीन महापौरांना अडीच वर्षातील उर्वरित कालावधी मिळणार आहे.
Last Updated : Apr 28, 2020, 12:20 PM IST