नांदेड :राज्यात ४८ पैकी १३ लोकसभा मतदारसंघात (Nanded Lok Sabha Constituency) भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून येईल की नाही, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच साशंकता आहे. त्यात मराठवाड्यातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघही त्यात समाविष्ट आहे. हे १३ मतदारसंघ भाजप सर्वाधिक फोकस केला (BJP Lok Sabha Objectives) आहे. जिल्ह्यातील भाजपची एकूणच श्रेष्ठींच्या डायरीत नोंद असून, त्यावर स्थिती पाहता भाजप श्रेष्ठींना वाटणारीचिंता रास्त आहे. (BJP Lok Sabha Election Preparations) जिल्ह्यात भाजपचे भाजपची संघटनात्मक व एकूणच राजकीय बांधणी खिळखिळी (Loksabha Election Nanded) झाल्याचे खासदार, तीन आमदार व एक विधान परिषद सदस्य आहेत. परंतु त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने आहेत. (Nanded Loksabha Seat in danger zone)
पक्षमजबुतीकडे दुर्लक्ष :या सर्वांना एकाच व्यासपीठावर पाहण्याचा क्षण दुर्मिळ ठरतो. खासदार-आमदारांतील गटबाजीमुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांना फारसा 'व्हॉइस' नाही. शहराध्यक्ष खासदारांच्या 'गुडबुक'मध्ये आहेत. सहसा आंदोलनांच्या वेळी कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची फारसी ताकद नाही. एका आमदाराला तर आपल्या गावच्या नगरपंचायतीत भोपळाही फोडता आला नाही. अशीच कमी-जास्त अवस्था भाजपची जिल्हाभरात आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यावर प्रमुख लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष दिले नाही. काँग्रेस व अशोकराव चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेण्यातच खासदारांची एनर्जी खर्चीमंजुरीच्या तेवढ्या घोषणा पडत असल्याचे दिसते. विकासाच्या बाबतीतही बोंबाबोंब आहे. कामांच्या पत्रपरिषदांमधून केल्या जात आहेत. केंद्रातून एकही मोठा प्रकल्प जिल्ह्यात आला नाही.
काँग्रेसकडून लोकसभा कोण लढविणार?
भाजपच्या काहीशी उलट स्थिती जिल्ह्यात काँग्रेसची आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने व्यापक नियोजन करून तशी तयारीही सुरू केली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील एन्ट्री नांदेडमधून झाली. या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. या यात्रेमुळे काँग्रेसचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे चार्ज झाले आहेत. त्याचा फायदा पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये नक्कीच होईल, असे मानले जाते.