नांदेड- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण ६५.१५ टक्के मतदान झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपा-सेना युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख १७ हजार ८३० मतदार होते. यात पुरुष मतदार संख्या ८ लाख ९१ हजार १०५ तर महिला मतदार संख्या ८ लाख २६ हजार ६६२ तसेच इतर ६३ मतदारांचा समावेश होता. त्यापैकी ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात पुरुष मतदार संख्या ५ लाख ९४ हजार ६१४ , स्त्री मतदार संख्या ५ लाख २४ हजार ४९०, इतर १२ असे एकूण ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान -
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्रातून मतदान प्रकिया पार पडली.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय माहिती पुढील प्रमाणे.
भोकर- स्त्री- मतदार संख्या ९१ हजार ३८९, पुरुष- मतदार संख्या १ लाख ४ हजार ४१९ , इतर एक असे एकूण झालेले मतदान १ लाख ९५ हजार ८०९ (टक्केवारी ७०.७१)
नांदेड उत्तर - स्त्री- मतदार संख्या ९० हजार २६८ , पुरुष- मतदार संख्या १ लाख २ हजार ९९७ इतर १० असे एकूण झालेले मतदान १ लाख ९३ हजार २७५ (टक्केवारी ६२.७३)