महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडचा पारा ४३ अंशावर, उन्हाच्या तडाक्याने नागरिक हैराण - water

जिल्ह्यात एकीकडे तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे वाढलेले तापमान नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अनेक भागात वीज गायब होत असल्यामुळे त्याचा देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेडचा पारा ४३ अंशावर

By

Published : May 21, 2019, 12:01 AM IST

नांदेड - गेल्या दोन-तीन दिवसांपासून नांदेडच्या तापमानात सतत वाढ होत आहे. आज सोमवारी नांदेडचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. वाढत्या तापमानामुळे नांदेडकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे.

नांदेडचा पारा ४३ अंशावर

मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच वाढलेले तापमान कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुर्य आग ओकतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या रमजानचा महिना असल्यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये गदी असते. परंतु, यंदा सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून येते. सायंकाळी सूर्यास्तानंतरच बाजारात तसेच रस्त्यांवर गर्दी पहावयास मिळत आहे. दुपारी उन्हाच्या वेळी लोक घरांमध्ये राहणेच पसंत करीत आहेत.

आज सोमवारी देखील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. जिल्ह्यात एकीकडे तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे वाढलेले तापमान नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अनेक भागात वीज गायब होत असल्यामुळे त्याचा देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. २५ मे पर्यंत तापमान वाढलेले राहिले असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे नागरिकांमध्ये वाढत्या तापमानाविषयी भिती निर्माण झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details