महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Hospital Death : नांदेडमधील रुग्णालयात आणखी ७ मृत्यू, मृतांचा आकडा ३१ वर, काहीजण अत्यवस्थ - नांदेडमधील रुग्णालय

Nanded Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सोमवारी २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाला होता. आज त्यात आणखी ७ मृत्यूंची भर पडली आहे.

Nanded Hospital Death
Nanded Hospital Death

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 12:03 PM IST

नांदेड Nanded Hospital Death : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच आहे. येथील मृतांचा आकडा वाढून आता ३१ वर पोहोचला. यामध्ये १६ नवजात बालकांचाही समावेश आहे. या रुग्णालयात काल २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश होता. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. याशिवाय एकूण ६६ रुग्णांची अवस्था नाजूक आहे.

आणखी ७ जणांचा मृत्यू : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली होती. हे मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे झाल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे राज्य हादरलं असून सरकारवर चोहीकडून टीका होत आहे. आता या रुग्णालयात आणखी ७ जणांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

अशोक चव्हाण यांचं ट्विट : झालेल्या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. 'नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान सुरूच आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. या प्रकरणी राज्य सरकारनं जबाबदारी निश्चित करावी', असं अशोक चव्हाण म्हणाले.

मंत्री हसन मुश्रीफ भेट देणार : या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफ स्वत: नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. ते रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती देणार आहेत. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. मी हॉस्पिटलला भेट देईन आणि डॉक्टरांची एक समिती स्थापन केली जाईल, असं मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा :

  1. Ghati Hospital Death Case : नांदेडनंतर संभाजीनगरच्या 'घाटी' रुग्णालयात मृत्यूचं तांडव, २४ तासात १४ रुग्ण दगावले
  2. Nanded Hospital Death : ५०० खाटांच्या रुग्णालयात १२०० रुग्णांवर उपचार सुरु, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस

ABOUT THE AUTHOR

...view details