महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Hospital Death Case : 'सरकारच व्हेंटिलेटरवर, रुग्णालयात साधी तापाची गोळी मिळेना' - Hemant Patil

Nanded Hospital Death Case : राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु, सध्याचे हे सरकार जागचे हालायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे, असा घणाघात (Ambadas Danve Criticizes On State Government) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Nanded Hospital Death
अंबादास दानवे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 9:30 PM IST

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नांदेड : Nanded Hospital Death Case :नांदेड येथील शासकीय रुग्णालय अस्त व्यस्त आहे. येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सरकार केवळ घोषणाच करत आहे. गतिमान सरकार प्रत्येकाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा नुसत्या घोषणा (Ambadas Danve Criticizes State Government) करत आहे. तर सामान्य कुटुंबातील लोकांना 50 - 50 हजार रुपये औषधांसाठी खर्च करावा लागतो. दवाखान्यात साधी तापाची गोळी उपलब्ध नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

हेमंत पाटील यांना स्टंटबाजी भोवली :सोमवारी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) रुग्णालयात पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस ॲम्बुलन्समधून औषधे आणून रुग्णालयात ठेवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर औषधं आणून काय उपयोग? असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve Nanded Hospital Death) यांनी केला आहे. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयातील अधिष्ठता यांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या प्रकरणात हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हेमंत पाटील हे नेहमी स्टंटबाज करत असतात, त्यांच्या या कृत्याचा दानवे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा : नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचा तांडव सुरूच आहे. आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात औषध व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर कर्मचारी संघटनांनी हेमंत पाटील यांनी केलेल्या कृत्याचा निषेध केला. कर्मचारी संघटनांनी कुठलेच काम बंद न करता काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. हेमंत पाटील यांनी माफी मागावी व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. नांदेडमधील डॉक्टर असोसिएशन यांनी हेमंत पाटील यांचा निषेध करत महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता.

रुग्णालयात जी पदे मंजूर आहेत, ती लवकर भरावी अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे केलीय. परंतु, अद्याप पदे भरले नाहीत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे ध्वजारोहण पुरते येत असतात. त्यांचं इकडे लक्ष नाही. डीनला स्वचछतागृह साफ करायला लावणे हे गंभीर आहे. डीन शेकडो विद्यार्थ्यांना घडवत असतात. कोविडच्या काळात येवढे मृत्यू झाले नाहीत, तेवढे या 24 तासात नांदेडमध्ये झाले आहेत. येणाऱ्या काळात शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयचा आढावा घेणार आहोत. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा नाही तर, राज्य शासनाने राजीनामा दिला पाहिजे - अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते, विधान परिषद

अंबादास दानवे यांच्या पत्रकार परिषदेचे मुद्दे : देशात नांदेडमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर आहे. साधी गोळीसुद्धा या रुग्णालयात मिळत नाही. एका महिलेचा औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य खात्यातील लोक हे टक्केवारीत गुंतलेले आहेत. नांदेडमध्ये 500 रुग्णांची व्यवस्था असताना, 1000 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. नर्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा -

  1. Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना...; 'त्या' प्रकरणावरून राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका
  2. Nanded Hospital Death Case : घटना दुर्दैवी, पण यंत्रणेचा दोष नाही; मुख्यमंत्र्यांचा दावा
  3. Nanded Hospital Death : नांदेडात मृत्यूचं तांडव सुरुच; रुग्णालयातील मृत्यूची संख्या 35 वर, 16 घरांचा हिरावला आनंद

ABOUT THE AUTHOR

...view details