महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 3, 2020, 7:29 AM IST

ETV Bharat / state

नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डातर्फे गोर गरीब गरजूंना घरपोच लंगर सेवा

लॉक डाउन परिस्थितीत शहर बंद मध्ये नागरिकांच्या खाण्या- पिण्याच्या वस्तूंसाठी हाल होत आहे. अशा वेळी गुरुद्वारा बोर्डाने मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध लंगर तयार करून वाटप सुरू केले आहे.

नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डातर्फे गोर गरीब गरजूंना घरपोच लंगर सेवा
नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डातर्फे गोर गरीब गरजूंना घरपोच लंगर सेवा

नांदेड - कोरोना वायरस विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या पाच दिवसापासून शहरातील नागरिकांना घरपोच लंगर (अन्नदान) करण्यात येत आहे. रोज हजारों लोकांना या अन्न दानाचा लाभ मिळत आहे.

नांदेड शहरात सध्या कलम 144 सुरू आहे. लॉक डाउन परिस्थितीत शहर बंद मध्ये नागरिकांच्या खाण्या- पिण्याच्या वस्तूंसाठी हाल होत आहे. अशा वेळी गुरुद्वारा बोर्डाने नेहमी प्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध लंगर तयार करून वाटप सुरू केले आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदर सिंघ मिनहास, उपाध्याय स. गुरविंदर सिंघ बावा यांच्या मार्गदर्शनात सचिव रविंदर सिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्र सिंघ मोटरावाले, अवतार सिंघ पहरेदार, अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी. पी. सिंघ चावला, कनिष्ठ अधीक्षक रविंद्र सिंघ कपूर आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी लंगर सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. तसेच सेवाभावी नागरिक या सेवेत आपला सहकार्य करीत आहेत. बोर्डाने लंगर तयार करण्यासाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला असून पहाटे चार वाजता पासून जेवण तयार करण्याचे कार्य सुरु होत असून रात्र उशिरा पर्यंत लंगर प्रयत्न सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details