नांदेड : 'मराठवाड्यात दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत व वेगाने प्रवास व्हावा यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बुलेट ट्रेन धावू शकते तर मराठवाड्यात का धावू शकत नाही? मराठवाड्यात बुलेट ट्रेन धावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. भाऊराव चव्हाण सहकार साखर कारखाना स्थापनेपासून शेतकऱ्यांचा एकही पैसा ठेवला नाही. यापुढेही ठेवण्यात येणार नाही', अशी स्पष्ट ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाऊरावच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काल (29 ऑगस्ट) दिली.
'बातम्याचे फोटो छापून आणतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही'
भाऊरावच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, की 'साखरेला भाव जादा मिळाला तरच ऊसाला जादा भाव देता येते. भविष्यात साखरेचे उत्पन्न कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. जो कारखाना पैसे देतो त्याच कारखान्याविरूद्ध विरोधक तक्रारी करून बातम्याचे फोटो छापून आणतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही'.