महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडातील आसनानदी बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्याने शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा - farmers crisis

प्रशासनाने बंधाऱ्याचे दरवाजे न काढल्याने नदिकाठच्या शेतात पाणी घुसले आहे. यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लवकर पंचनामे केले नाही तर महामार्ग (क्रमांक-६१) अडवणार असल्याचा शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. तसेच नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही तर आत्मदहन करणार अशी संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

नांदेडातील आसनानदी बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्याने शेतीचे नुकसान

By

Published : Sep 21, 2019, 9:25 PM IST

नांदेड - संततधार पावसामुळे जिल्ह्यातील आसना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. प्रशासनाने बंधाऱ्याचे दरवाजे न काढल्याने नदिकाठच्या शेतात पाणी घुसले आहे. यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी शेतकरी आणि पोलीस यांची शाब्दिक चकमक झाली. जर लवकर पंचनामे केले नाही तर महामार्ग (क्रमांक-६१) अडवणार असल्याचा शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. आम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही, तर आत्मदहन करणार अशी संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

नांदेडातील आसनानदी बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्याने शेतीचे नुकसान

हेही वाचा - नंदुरबार: धरणातून सोडलेल्या पाण्याने नवापूर तालुक्यातील पिकाचे नुकसान

नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने आसना नदीच्या पात्रात पाण्याचा जोर वाढला आहे. यावेळी आसना बंधाऱ्याचे दरवाजे न काढल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आसना नदीच्या दुतर्फा असलेल्या शेतात पाणी शिरून जमिनी आणि पेरलेली पिके वाहून गेली आहेत. नांदेड तालुक्यातील सांगवी (बु.) व अर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव येथील नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. पिकांचे नुकसान झालेच त्यासोबतच जमिनीतील माती वाहून गेल्याने आता रब्बी हंगामाचं काय होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.

नांदेड शहराला सांगवी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. बंधाऱ्याचे दरवाजे कायम बंद असताता पावसाळ्यातही या गेटकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचे शेतकरी म्हणाले. अशाच पद्धतीने २०१६ मध्ये शेतीचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. संबंधित अधिकाऱयांना शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी सुचना देऊनही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. "शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही तर आत्मदहन करणार अशी संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकरी शंकरराव कल्याणकर व आनंदराव कल्याणकर यांनी दिल्या आहेत. त्यांनी नुकसान झाल्यानंतर बंधाऱ्यांचे दरवाजे काढणाऱया जेसीबीला अडवले होते.

वेळोवेळी अधिकारी व प्रशासनाला कळवूनही त्यांनी काहीच पाऊले उचली नाहीत की साधी जबाबदारी स्विकारली नाही. या संदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांचीही चौकशी करावी व तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मदन कल्याणकर यांनी यावेळी दिला.

अशोक चव्हाण यांची घटनास्थळी भेट -

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. बॅकवाटरमुळे शेतीचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी शेतीचे पंचनामे करावेत व गरज पडल्यास ड्रोन कॅमेऱ्या द्वारे पंचनामा करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. यासाठी आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. घटनास्थळी महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे.
यावेळी अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, वैद्य, परमेश्वर कदम, हेमंत देशपांडे, केदार, लांडगे आदींनी भेट दिली.

हेही वाचा - राज्यात पुन्हा एकदा 'मी शेतकरी'च्या माध्यमातून बळीराजाचा एल्गार; गांधी जयंतीपासून आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details