Nanded Year Ender 2021 : पोटनिवडणूक, आयकर विभागाच्या छाप्यांसह 'या' घडामोडींमुळे नांदेड जिल्हा राहिला चर्चेत - Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari
नांदेड जिल्ह्याला 2021 मध्ये अनेक ऐतिहासिक संकटाना तोंड द्यावे लागले. कोरोनासह सर्वच संकटांना तोंड देत नांदेड जिल्ह्याने स्वतःला सावरले. 2021 च्या सुरुवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैराण करून सोडले. यंदा जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत काही दिवस वगळता सारखाच पाऊस सुरू होता. 1983 नंतरची मोठी अतिवृष्टी होती. शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला. देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचेच चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरविले. यात भाजपचा पराभव करत काँग्रेसचा मोठा विजय ( Jitesh Antapurkar Won the by Election ) झाला.
नांदेड -2021 मध्ये अनेक ऐतिहासिक संकटाना नांदेड जिल्ह्याला तोंड द्यावे लागले. कोरोनासह सर्वच संकटांना तोंड देत नांदेड जिल्ह्याने स्वतःला सावरले. 2021 च्या सुरुवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैराण करून सोडले. यंदा जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत काही दिवस वगळता सारखाच पाऊस सुरू होता. 1983 नंतरची मोठी अतिवृष्टी होती. शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला. देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचेच चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरविले. यात भाजपचा पराभव करत काँग्रेसचा मोठा विजय ( Jitesh Antapurkar Won the by Election ) झाला.
- नांदेड जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान कोरोनाचा कहर -नांदेड जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. दररोज हजारोंच्या संख्येत रुग्ण सापडत होते तर मृत्यूची संख्याही मोठी होती. हिमायतनगर तालुक्यात 22 डिसेंबर, 2021 रोजी कोरोना बाधित झालेल्या 2 रुग्णांचे स्वॅब जीनोम सीक्वेंसिंगसाठी राष्ट्रीय विषाणूजन्य रोग संशोधन संस्था पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता प्राप्त अहवालानुसार हे 2 रुग्ण हे ओमायक्रॉन ( Omicron in Nanded ) या कोरोनाच्या ( Corona in Nanded ) नवीन प्रकारच्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे बाधित झाले आहेत, असे निष्पन्न झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 90 हजार 542 एवढी झाली असून यातील 87 हजार 869 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 18 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे.
- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. पुराचे पाणी गावागावात शिरले होते. तसेच जिल्ह्यातील पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शब्द महाविकास आघाडी सरकारने पाळला. राज्यातील शेती पिकांच्या नुकसानापोटी देय असलेल्या मदत निधीपैकी 75 टक्के रक्कम 2 हजार 860 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश जारी झाला. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 455 कोटी रूपये मिळणार आहेत.
- पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा विजय -संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी ( Jitesh Antapurkar Won the by Election ) झाले. भाजपच्या सुभाष साबणेंचा त्यांनी तब्बल 41 हजार 933 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. काँग्रेस आणि भाजपसाठीही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. या पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती व्हावी यासाठी भाजपाने आपला पूर्ण जोर लावला होता. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री भागवत खुबा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. तर काँग्रेसचा गड म्हणणाऱ्या महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवार, मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले, धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे यांच्या सभांच्या तोफा धडकल्या होत्या. आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघ पोटनिवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस, भाजपा व वंचित आघाडी, अशी तिहेरी झाली होती.
- एनआयएने पकडलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू -एनआयएने ( National Investigation Agency ) पकडलेल्या अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटकेत असलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला. त्याबाबत वजिराबाद पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद आहे. जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर, असे मृताचे नाव आहे. मागील महिन्यात एनआयए शाखा मुंबईने नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात अमली पदार्थ या व्याख्येत येणारे अफुबोंडे आणि अफीम जपेत केले होते. त्यात एकूण 4 जणांना अटक झाली होती. तिघांना न्यायालयाने 26 नोव्हेंबरला तुरूंगात पाठवले होते. या तिघांमध्ये एकाचे नाव जितेंद्रसिंघ परगणसिंघ भुल्लर, असे होते. जितेंद्रसिंघ हा कैदी नांदेडच्या तुरूंगात राहत होता. 9 डिसेंबरला दुपारी त्याच्या सोबतच्या इतर कैद्यांनी त्याला आवाज दिला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इतर कैद्यांनी तेथील सुरक्षा रक्षकांना बोलावले. जितेंद्रसिंघला उपचारासाठी सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे दाखल केले. पण, उपचारादरम्यान 10 डिसेंबरला रात्री 10 वाजता जितेंद्रसिंघचा मृत्यू झाला.
- यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत -नवरात्रोत्सव आला की राज्यातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांकडे भाविकांची पावले आपोआप वळतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक याठिकाणी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान आहे. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. नवरात्रोत्सवात येथे जास्त गर्दी बघायला मिळते. 7 ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे सुरू असल्यामुळे साहजिकच माहूरगडचा यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव हर्षोउल्हासात आणि भक्तांच्या गर्दीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत शारदीय नवरात्र उत्सव झाल्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला. 51 कोटी रूपयांची मंजुरी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसुया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे.
- माहूरच्या भोंदूबाबाचा पर्दाफाश -जिल्ह्यातील माहूरमध्ये रक्ताने अभिषेक करून अघोरी प्रयोग करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलीसांनी जादूटोणा कायद्या अंतर्गत अटक केली. विश्वजित कपीले, असे अटक केलेल्या भोंदुबाबाचे नाव होते. या भोंदुबाबाचा भांडाफोड बाबाच्या मुंबई येथील प्रविण शेरकर या भक्तानेच केला आहे. त्या भोंदू बाबाने शेरकर यांनी 2013 ते 2020 पर्यंत रोख रकमेसह अनेक वस्तू असे, 23 लाखांची फसवणूक केली होती. भोंदुबाबासह चार जणांविरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
- व्यापारी सुबोध काकानी यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा -धर्माबाद शहरातील युवा उद्योजक व व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारिणीमधील विश्वस्त संचालक असलेले सुबोध काकानी यांच्या घरासह त्यांच्या विविध कार्यालय व संस्थेवर केंद्रीय आयकर विभागाचा छापा ( Income Tax Department Raid ) पडला. या घटनेमुळे धर्माबाद शहर हादरले होते.
- मंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याची झाडाझडती -बुलडाणा अर्बन बॅंकेवर ( Buldana Urban Bank ) आयकर विभागाने छापे टाकून चौकशी सुरू केली. या चौकशीत बॅंकेने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Minister Ashok Chavan ) यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचीही चौकशी होत आहे. दरम्यान, देगलूर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने ही कार्यवाही असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती.
- नांदेडला राज्यातील सर्वाधिक पीकविमा मंजूर -नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक 458 कोटी 89 लाखांचा विमा परतावा नांदेडला मंजूर झाला. या कामात प्रशासनाने विमा कंपनी तसेच कृषी विभागाचा चांगला समन्वय होता. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- देशाच्या हवाई दल प्रमुखपदी विवेक चौधरी -देशाच्या हवाई दल प्रमुखपदी विवेक राम चौधरी ( Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari ) यांची निवड करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर, 2021 रोजी त्यांनी पदभार स्वीकारले. त्यांचे कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हस्तरा (ता. हदगाव) या गावचे आहे.