महाराष्ट्र

maharashtra

नांदेड : जिल्ह्यात आज 1 हजार 232 जणांनी केली कोरोनावर मात; तर 769 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By

Published : Apr 28, 2021, 10:37 PM IST

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 78 हजार 701 एवढी झाली असून यातील 65 हजार 14 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सद्यस्थिती 11 हजार 917 रूग्ण उपचार घेत असून 192 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तीन दिवसात 24 रुग्णांचा मृत्यु दिनांक 26 ते 28 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नांदेड कोरोना अहवाल
नांदेड कोरोना अहवाल

नांदेड - जिल्ह्यात आज (बुधवारी) प्राप्त झालेल्या 3 हजार 662 अहवालापैकी 769 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 617 तर अँटिजेन तपासणीद्वारे 152 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 78 हजार 701 एवढी झाली असून यातील 65 हजार 14 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सद्यस्थिती 11 हजार 917 रूग्ण उपचार घेत असून 192 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तीन दिवसात 24 रुग्णांचा मृत्यु दिनांक 26 ते 28 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 507 एवढी झाली आहे.

उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 35 बेड्स उपलब्ध आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details