महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात शनिवारी 1 हजार 43 कोरोनामुक्त तर 497 नवे पॉझिटिव्ह

नांदेड - जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 840 अहवालापैकी 497 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 419 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 84 हजार 624 एवढी झाली आहे.

corona update nanded
corona update nanded

By

Published : May 9, 2021, 1:04 AM IST

नांदेड -जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 840 अहवालापैकी 497 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 419 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 84 हजार 624 एवढी झाली असून यातील 76 हजार 944 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 हजार 691 रुग्ण उपचार घेत असून 184 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

मागील तीन दिवसात 13 मृत्यू -

6 ते 8 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 696 एवढी झाली आहे.

जिल्ह्यात 5 हजार 691 रुग्णांवर उपचार सुरू -


5 हजार 691 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 114, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 72, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 74, देगलूर कोविड रुग्णालय 21, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, बिलोली कोविड केअर सेंटर 93, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 22, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 40, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 38, मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 36, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 9, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 16, एनआरआय कोविड केअर सेंटर 49, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 531, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 872, खाजगी रुग्णालय 1 हजार 314 व्यक्ती उपचार घेत आहेत.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 60, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -


एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 82 हजार 117
निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 87 हजार 460
पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 84 हजार 624
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 76 हजार 944
मृत्यू संख्या-1 हजार 696
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.92 टक्के
शनिवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21
शनिवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-64
शनिवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-381
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 691
शनिवारी अतिगंभीर प्रकृती असलेले-184

ABOUT THE AUTHOR

...view details