महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded District Court : आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल; न्यायालयाने तत्काळ सुनावली सहा महिन्याची शिक्षा - दत्ता हंबर्डे

दरोड्याचा गुन्ह्यातील आरोपी सुनावणीसाठी नांदेड जिल्हा न्यायालयात आला होता. सुनावणी दरम्यान त्याचा वकील आला नसल्याच्या कारणावरून आरोपी दत्ता हंबर्डेने न्यायाधीशांसोबत वाद घातला. अचानक त्याने चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. न्यायाधीशांनी या कृत्यासाठी आरोपीला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजारांचा दंड ठोठावला.

accused
आरोपी

By

Published : Jan 11, 2023, 10:22 PM IST

नांदेड :न्यायालयामध्ये आज बुधवारी एका आरोपीने न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावली. त्यानंतर न्यायाधीशाने तात्काळ त्या आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला दत्ता हंबर्डे हा सुनावणीसाठी कोर्टात आला होता. सुनावणीसाठी त्याचा वकील आला नसल्याच्या कारणावरून आरोपी दत्ता हंबर्डेने न्यायाधीशांसोबत वाद घातला. अचानक त्याने चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. न्यायाधीशांनी या कृत्यासाठी आरोपीला तात्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजारांचा दंड ठोठावला. या घटनेने नांदेड न्यायालयात खळबळ उडाली घटनेने खळबळ उडाली.

न्यायालयात भिरकावली चप्पल : जिल्हा न्यायालयात दरोडा व जबरी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला साक्षनिमित्त बोलावले असता त्याने चक्क जिल्हा न्यायाधीश (प्रथम) शशिकांत बांगर यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यावेळी न्यायालयात एकच गोंधळ उडाला. या धक्कादायक प्रकारानंतर न्यायाधीश बांगर यांनी आरोपी दत्ता हंबर्डे याला जागेवर लगेचच सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली.

दरोड्यांच्या गुन्ह्यांतील आरोपी : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष्णुपुरी येथील आरोपी दत्ता हरी हंबर्डे याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो मागील काही दिवसांपासून नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला व त्याच्या इतर साथीदाराला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) शशिकांत बांगर यांच्या न्यायालयासमोर साक्षीसाठी बोलावण्यात आले होते.

आरोपी ताब्यात : यावेळी साक्ष सुरू असतानाच आरोपी दत्ता हंबर्डे यांनी आपल्या शर्ट मध्ये आणलेली चप्पल न्यायाधीश बांगर यांच्या दिशेने भिरकावली. मात्र चप्पल डायसच्या अलीकडेच पडल्याने अनर्थ टळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा व न्यायालयीन कर्मचारी यांच्यात एकच खळबळ उडली. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन बाजूला केले.

ABOUT THE AUTHOR

...view details