नांदेड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ऑनलॉक दरम्यान बाजारपेठा सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यात आता बदल करत नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. यानुसार रविवारी संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठा सुरू राहणार आहेत. यामुळे व्यापारी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
नांदेड : आता रविवारीही सर्व दुकानं अनलॉक...जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश
रविवारी संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठा सुरू राहणार आहेत. यामुळे व्यापारी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठांसह सर्वत्र लॉकडॉऊन करण्यात आले होते. या दरम्यान सर्वसामान्यांची होरपळ झाल्यानंतर शासनाने केंद्र सरकारच्या सुचनेनुसार ऑनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. काही दुकानं उघडण्यास परवानगी दिली होती. त्यानंतरच्या काळात सोमवार ते शनिवार दरम्यान बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या होत्या. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर एक नवा आदेश काढून या नियमावलीत बदल केला आहे.
या नव्या आदेशात रविवारीही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या दरम्यान चालू करण्याची परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.