नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले होते. परंतु, शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार दिनांक १५ एप्रिलपासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.
कोरोना : नांदेडच्या जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार 15 तारखेपासून सुरू - nanded corona news
शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार दिनांक १५ एप्रिलपासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय अनुदान व पीक विम्याच्या रकमेचे वाटप बंद करण्याचे आदेश दिनांक २३ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने दिले होते. दिनांक १३ एप्रिल रोजी सदर आदेश रद्द करण्यात आले असून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण विचारात घेऊन लॉकडाऊन काळात पुढील बाबीची खबरदारी घेऊन टोकण पद्धत व स्वयंसेवकांची मदत घेऊन सुरक्षित अंतर राखत जिल्हा बँकेच्या सर्व शाखेमधून १५ एप्रिलपासून शासकीय पिक विमा व ऊस अनुदान उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलाची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. दररोज फक्त १०० खातेदारांना वाटप करण्यात येईल. सुरक्षित अंतर राखून व तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधून शेतकरी व ग्राहकांनी १ मीटर अंतर ठेवून रांगेत उभे राहून एका-एकाला वाटप करण्यात येणार आहे.
ज्यांना रक्कम वाटप करायची आहे, अशा खातेदारांची यादी १ दिवस आधी संबंधित गावच्या ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येईल. त्याच ग्राहकांनी त्यांना ठरवून दिलेल्या वेळेत शाखेत उपस्थित राहून रक्कम उचलावी आणि बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक दिलीप कंदकुर्ते संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी केले आहे.