नांदेड - कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ भीतीपोटी रेमडेसिव्हीर इजेंक्शनबाबत ज्यांना आवश्यकता नाही ते सुध्दा यासाठी आग्रह करताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत रेमडेसिव्हीर इजेंक्शन औषधाचे वितरण व विक्री यातील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 आणि भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
आम्ही प्रयत्नांची शर्त करु, सहकार्य द्या- जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी खांद्याला-खांदा लावून प्रयत्नांची शर्त करीत आहेत. गतवर्षी कोरोनाचे आव्हान नवीन असूनही नागरिकांच्या सहकार्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव आपण लवकर आटोक्यात आणू. यावर्षीही आपली मोलाची साथ देऊन सहकार्य अपेक्षित असून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची करू करू, अशी सादही जिल्हाधिकारी यांनी नांदेड जिल्हावासीयांना घातली आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी निर्गमित केलेले आदेश पुढीलप्रमाणे....!
1) कोविड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यता प्राप्त असलेले प्रमाणपत्र त्यांचे संलग्न असलेले मेडिकल स्टोअरचे परवाने यांच्यासह घाऊक विक्रेता किंवा सी.ॲन्ड.एफ एजंट यांच्याकडे लेखी मागणी नोंदवावी.
2) रेमडेसिव्हीर इजेंक्शनची मागणी करताना रुग्णालयातील रुग्ण संख्या विचारात घेऊन व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडेसिव्हीर इजेंक्शनची आवश्यकता आहे, अशी संख्या विचारात घेवून तीन दिवस पुरेल एवढ्या रेमडेसिव्हीर इजेंक्शनची मागणी नोंदवावी. या औषधाची मागणी नोंदविण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाचा कोविड क्लिक मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.
3) घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी.ॲन्ड.एफ एजंट यांनी रुग्णाची कागदपत्राची योग्य प्रकारे शहानिशा केल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा. त्याबाबतचे लेखी
अभिलेख जतन करावे.
3) औषध दुकानावरुन थेट रेमडेसिव्हीर औषधाची विक्रीवर बंदी घालण्यात येत असून रेमडेसिव्हीर औषधाचा पुरवठा स्टॉकिस्टद्वारा केवळ कोविड हॉस्पिटल, हॉस्पिटलला संलग्न असलेल्या मेडिकल येथे करण्यात यावा.
5) सर्व घाऊक विक्रेत्यांनी किंवा सी.आय.ॲन्ड.एफ एजंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन माहिती उदा :- कोविड रुग्णालयाचे नाव , संलग्न मेडिकलचे नाव, बिल क्रमांक, दिनांक, एकूण विक्री संख्या इत्यादीबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयास दररोज सादर करावी.
6) ज्या रुग्णालयाच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर नाही त्यांनी स्वत: रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी.आय.ॲन्ड.एफ एजंट यांच्याकडून करावी. तसेच औषधे व
सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा. व त्यामध्ये खरेदी केलेला साठा औषधाचे नांव, समुह क्रमांक , औषध पुरवठ्याचा दिनांक , रुग्णाचा
तपशिल , पुरविलेले इंजेक्शन, डॉक्टरांचे नाव, आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यायावत ठेवावी. इंजेक्शन खरेदी वापर, विक्री व शिल्लक साठा याचा ताळमेळ ठेवावा.