नांदेड -जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 (25, 26 व 27 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत. हे नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या http://panchayatelection.mah.gov.in या संकेतस्थळावर भरून नामनिर्देशन पत्राची प्रिंट काढल्यानंतर आवश्यक त्याठिकाणी स्वाक्षरी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे घोषणापत्र आवश्यक...