नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 41 अहवालांपैकी 210 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 113 तर अँटिजेन तपासणीद्वारे 97 बाधितांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आठ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 5.19 टक्केवर आला आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 88 हजार 209 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 84 हजार 287 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 626 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 68 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 860 इतकी झाली आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 105, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.
हेही वाचा -तीन दिवसात राज्यांना मिळणार ४८ लाख लशींचे डोस - केंद्र सरकार
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 17 हजार 729
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 18 हजार 959
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 88 हजार 209
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 287
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 860
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-27
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-213
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 626
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-68
हेही वाचा -लसीच्या तुटवड्यावरून उद्या केंद्र सरकारविरोधात मुंबई कॉंग्रेसचे आंदोलन