महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट : 702 बाधित... 25 मृत्यू...1311 रुग्णांना सुट्टी...! - new cases in nanded

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या २ हजार ७०८ अहवालापैकी ७०२ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६०४ तर अँटिजेन तपासणीद्वारे ९८ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ८१  हजार९८६ एवढी झाली असून जिल्ह्यातील १ हजार ३११ कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी मिळाली आहे. आजच्या घडीला ८ हजार  ८३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

Nanded Corona Update
नांदेड कोरोना अपडेट

By

Published : May 3, 2021, 11:01 PM IST

नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या २ हजार ७०८ अहवालापैकी ७०२ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६०४ तर अँटिजेन तपासणीद्वारे ९८ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ८१ हजार९८६ एवढी झाली असून जिल्ह्यातील १ हजार ३११ कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी मिळाली आहे. आजच्या घडीला ८ हजार ८३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९२ टक्के...!

दि. १ ते ३ मे या तीन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ६२४ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९२ टक्के आहे.


जिल्ह्यातील १ हजार ३११ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी...!

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १८, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७५८, धमार्बाद तालुक्यातंर्गत १८, देगलूर कोविड रुग्णालय ६, अर्धापूर तालुक्यातंर्गत २६, उमरी तालुक्यातंर्गत ३१, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय १,हैद्राबाद येथे संदर्भित १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३१, मुखेड कोविड रुग्णालय ४४, नायगाव तालुक्यातर्गत ७, किनवट कोविड रुग्णालय ७८, हिमायतनगर तालुक्यातर्गंत ४, बिलोली तालुक्यातंर्गत ५, मुदखेड कोविड केअर सेटर १६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १२, हदगाव कोविड रुग्णालय १३, कंधार तालुक्यातंर्गत १०, माहूर तालुक्यातंर्गत ७, लोहा तालुक्यातंर्गत ४९, भोकर कोविड केअर सेंटर ३८, खाजगी रुग्णालय १३८ बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी....!

आज ८ हजार८३५ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १६३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ९१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) १७२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ४७, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ८१, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ८१, देगलूर कोविड रुग्णालय ३५, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर १९, बिलोली कोविड केअर सेंटर ८३, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १, नायगाव कोविड केअर सेंटर १९, उमरी कोविड केअर सेंटर २८ माहूर कोविड केअर सेंटर २४, भोकर कोविड केअर सेंटर ८, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ४८, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३७, कंधार कोविड केअर सेंटर १७, धर्माबाद कोविड केअर सेंटर ४३ , मुदखेड कोविड केअर सेंटर १३, अर्धापूर कोविड केअर सेंटर २२, बारड कोविड केअर सेंटर २५, मांडवी कोविड केअर सेंटर ९, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय ४, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर ४०, एनआरआय कोविड केअर सेंटर ४६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर ११६ , नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ३ हजार ४१४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण २ हजार ३६०, खाजगी रुग्णालय १ हजार ७८९, असे एकूण ८ हजार ८३५ उपचार घेत आहेत.

पलब्ध असलेल्या खाटांची संख्या...!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 26, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 51 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती...!

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 68 हजार 717
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 77 हजार 33
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 81 हजार 986
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 71 हजार 265
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 624
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.92 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-26
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-380
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 8 हजार 835
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-125

हेही वाचा - रायगड : सरकारचा निषेध व्यक्त करत पत्रकारांनी केले आत्मक्लेष आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details