नांदेड- जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नादेंडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देखील 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले. शनिवारी 147 रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1986 वर पोहोचली आहे.
दिवसभरात 48 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. 2 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 83 एवढी झाली आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 281 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 1हजार 88 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 147 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1986 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 935 जण कोरोनामुक्त झाले असून 957 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 252 एवढी आहे. शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने होत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे. दरम्यान, शनिवारी सर्वाधिक म्हणजे 1 हजार 281 नमुन्यांची तपासणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.....!
सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 367
घेतलेले स्वॅब- 15 हजार 75