महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांचे राजीनामे - अमर राजूरकर

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पण काँग्रेसचा हा बालेकिल्ला आता भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतला आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा येथे पराभव  झाला होता. चव्हाणांनंतर जिल्हा काँग्रेसमध्येसुद्धा काँग्रेसच्या पराभवाचे मंथन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर आणि काँग्रेसचे आमदार आणि नांदेड महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला.

राजीनामा दिलेले काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे.

By

Published : Jun 8, 2019, 11:33 AM IST

नांदेड - लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच काँग्रेस नेत्यांनी आत्मपरिक्षण केले व त्यानूसार जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पण या बाबतीत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात कुठलीही हालचाल नव्हती. बऱ्याच कालावधीनंतर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविले आहेत.


नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पण काँग्रेसचा हा बालेकिल्ला आता भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतला आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा येथे पराभव झाला होता. या पराभवानंतर पदाधिकाऱ्यांनी मंथन केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला होता.


बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा काँग्रेसमध्येसुद्धा काँग्रेसच्या पराभवाचे मंथन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर आणि काँग्रेसचे आमदार आणि नांदेड महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील 16 तालुकाध्यक्षांनी तसेच सिडको, तरोडा ब्लॉक यांच्या अध्यक्षांनीही अशोक चव्हाण यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. यापूर्वीच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर यांनी राजीनामा दिला होता. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा ते स्वीकारणार की नाही याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.


अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षात आमुलाग्र बदल करणे आवश्यक असून त्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे सांगितले होते. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा काँग्रेस समितीची पुनर्रचना करण्यास सोपे जावे यासाठी राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details