नांदेड- सोयाबीन पेरणी करूनही उगवले नसल्याचे प्रकार मराठवाड्यात घडले आहेत. पेरणीनंतर पाच ते सहा दिवसांनी बियाण्यांची उगवण होत नसल्याबाबत काही गावातील शेतकऱ्यांकडे सरकारकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्या पार्श्वभीमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कासारखेडा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष सोयाबीन उगवणीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत सोयाबीनला आपत्कालीन पिकांचा पर्याय निर्माण करावा. त्यामधून खरीप हंगाम यशस्वी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.
सोयाबीन उगवण न झालेल्या क्षेत्रात आपत्कालीन पीक व्यवस्थापन करावे - जिल्हाधिकारी - soybean farming in Nanded
जिल्ह्यातील कासारखेडा (ता.नांदेड) येथे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. या ठिकाणी भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोयाबीन उगवण कमी होण्याची कारणे शेतकरी व शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली.

जिल्ह्यातील कासारखेडा (ता.नांदेड) येथे खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. या ठिकाणी भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोयाबीन उगवण कमी होण्याची कारणे शेतकरी व शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत आहे. सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतावर दुबार पेरणी करावी. अल्प प्रमाणात उगवलेल्या ठिकाणी मूग, उडीद, तूर व सूर्यफूल अशा पिकांची लागवड करावी, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव रविकुमार, कृषी विकास अधिकारी नादरे, तहसीलदार सारंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राऊत ,मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.