महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत बदल; दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार - नांदेड लॉकडाऊन न्यूज

नांदेड जिल्ह्यातील दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी दिले. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत दुकाने सुरु राहणार आहेत.

nanded corona update
नांदेड कोरोना अपडेट

By

Published : Aug 12, 2020, 3:17 AM IST

नांदेड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आस्थापना व दुकानांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी दिले आहेत. यानुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यापुर्वी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.

जिल्हाधिकारी इटणकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्या- टप्प्याने शिथिलता देण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. त्यानंतर या आदेशात बदल करुन सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी मंगळवारी नव्याने आदेश काढून जिल्ह्यातील आस्थापना व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे आता जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, शनिवारी आणि रविवारी दुकाने मात्र पुर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details