महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये आणखी एकास कोरोनाची लागण; रुग्णसंख्या पोहचली 52 वर - nanded city corona positive cases

दिल्लीतील एका 60 वर्षीय यात्रेकरूस नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता. 11) प्राप्त झाला. शहरामधील कोरोनाबाधितांची संख्या 52 वर पोहोचली आहे. एनआरआय सेंटर येथे हा रुग्ण भरती असून ते दिल्लीहून नांदेड येथे दर्शनासाठी आल्याची माहिती मिळाली आहे.

नांदेडमध्ये 52 कोरोनाबाधित
नांदेडमध्ये 52 कोरोनाबाधित

By

Published : May 12, 2020, 9:42 AM IST

नांदेड - दिल्लीतील एका 60 वर्षीय यात्रेकरूस नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी (ता. 11) ला येथील 115 अहवालांपैकी 114 अहवाल निगेटिव्ह आले. यानंतर शहरामधील कोरोनाबाधितांची संख्या 52 वर पोहोचली आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.

एनआरआय सेंटर येथे हा रुग्ण भरती असून ते दिल्लीहून नांदेड येथे दर्शनासाठी आल्याची माहिती मिळाली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या आता 52 वर पोहोचल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, घाबरून न जाता घरात राहावे आणि सुरक्षित रहावे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे.

नांदेड जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती (11 मे 2020, सायं 05.00)
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 1816
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 1703
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 614
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 108
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 247
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 1456
• एकूण नमुने तपासणी- 1828
• एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 52
• पैकी निगेटीव्ह - 1706
• नमुने तपासणी अहवाल आज बाकी- 38
• नाकारण्यात आलेले नमुने - 6
• अनिर्णित अहवाल – 25
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 98 हजार 690 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details